स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना (शिंदे) यांच्यात स्थानिक पातळीवर नेत्यांना पक्षात घेण्याची चढाओढ सुरू आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केली. यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला डिवचलं. तर मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या या चर्चेवर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली.












