Anjali Damania: पार्थ पवार हे जमीन व्यवहारांमुळे अडचणीत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत भूमिका मांडली. दरम्यान अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल असा दावा आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसंच अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांना कुठलीही क्लिन चीट मिळालेली नाही असंही अंजली दमानिया म्हणाल्या.














