Eknath Shinde: संगमनेर येथे पार पडलेल्या प्रचार सभेला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी शिंदेंनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना व्यासपीठावरून थेट फोन लावत दोन महिन्यात एमआयडीसी मंजुरीचे नोटिफिकेशन काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनाही फोन लावत पालिकेच्या आवारातील बंद असलेल्या ‘कॉटेज हॉस्पिटल’च्या जागेवर महिला व बालकांसाठी रुग्णालय उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आबिटकर आणि सामंत यांच्यासोबत शिंदेंचा फोनवर झालेला संवाद बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेत ऐकवला. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.








