भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगानं बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातलं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर त्यांची आणि रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे, पण आता त्या बैठकीवर आणि मनपा निवणुकीसाठी झालेल्या एकमतावर आता शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे












