Sanjay Raut: मागील काही दिवसांपासून शिवेसना (ठाकरे) आणि मनसेच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. त्यानंतर आता शिवेसना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी मोठी अपडेट दिली आहे. ‘ठाकरे बंधूंची युती झाली आहे आणि आता जागावाटपाची घोषणा करण्यात येणार आहे’, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं आहे.













