Indian NRIs returning Explainer: आजवर पासपोर्ट, चलन, जागतिक अनुभव व सुरक्षित भविष्य यांच्या बाबतीतील आश्वासनं कोट्यवधी भारतीयांना सातासमुद्रापार खेचून नेत होती. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत जवळपास १० लाख भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले. परंतु, २०२५ मध्ये एक मोठा बदल दिसून आला आहे. जे लोक एकेकाळी संधींच्या शोधात देश सोडून गेले होते, ते आता पुन्हा मायदेशाकडे वळत आहेत. परदेशातील अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. परदेशस्थ भारतीय म्हणजेच एनआरआय मायदेशी का परतत आहेत? जाणून घेऊयात…









