Pune News: पुणे शहरातील कोंढवा भागात दारूचा साठा असलेल्या घरामध्ये पोलीस कारवाई करण्यासाठी गेले होते. कारवाईमध्ये २ लाख रुपये किंमतीची दारू आणि एका कपाटामध्ये तब्बल १ कोटी रुपये आढळून आले आहे. यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी नोटा मोजण्याची मशीन आणली होती. या सर्व नोटा मोजण्यास तब्बल दोन तासाहून अधिक काळ लागला.

















