ठाणे शहरातील कोंडीविषयी सातत्याने चर्चा होत असते. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत वाहतुक कोंडी हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. ‘लोकसत्ता’तर्फे लोकसत्ता लोकसंवाद या परिसंवादाचे आयोजन सोमवारी ठाणे येथे करण्यात आले होते. यावेळी ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट उपस्थित होते. त्यांनी ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील वाहतुक नियोजनाविषयी आणि भविष्यातील प्रकल्पांविषयी माहिती दिली. यासोबतच, शहरात मुंबई महानगर प्रदेशात अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु असल्याने येथील रहिवाशांना त्याचा त्रास होत असला तरी ठाणेकरांनो संयम आणि शिस्त बाळगा याचे भविष्यात फायदे दिसतील असेही शिरसाट म्हणाले.


















