मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि सण-उत्सवांसाठी उद्धव आणि राज ठाकरेंनी काय केले, असा सवाल आशीष शेलार यांनी केला. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला कोणताही फरक पडणार नाही. निवडणुका आल्या की, मराठी माणूस, मराठी भाषा, मुंबई तोडणार, राजरातला जोडणार आदी भावनिक मुद्दे उपस्थित केले जातात असं भाष्य आशिष शेलार यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात केले








