महानगरपालिका निवडणुकीतील मुद्दे, भाजपकडून होणारे आरोप, मुंबईतील पायाभूत सुविधा ते महानगरपालिकेतील ठेवी, अशा विविध विषयांवर आदित्य ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली. पर्यावरणाच्या मुद्द्यावर महायुती सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील हवा प्रदुषणाची सध्या परिस्थिती गंभीर आहे. याला सर्वस्वी सरकार आणि पालिका प्रशासन जबाबदार आहे, अशी टीका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात केली.












