राष्ट्रवादी काँग्रेसचं विलनीकरण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. अजित पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे शरद पवार जर त्यांच्या पक्षात आले, तर आमचं काही मत असण्याचं कारण नाही, असं स्पष्टीकरण भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. आम्हाला विरोध करणारे सारे जण कधी ना कधी आमच्या ताटात जेवून गेले आहेत, असं मिश्कील विधानही त्यांनी केलं.















