डोंबिवली पूर्व प्रभाग क्रमांंक २९ मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये पालिका निवडणुकीसाठी लढत होत आहे. या प्रभागात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आपल्या ताकदीने प्रचार करत आहेत. तुल्यबळ अशी लढत या प्रभागांमध्ये होत आहे. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये रविवारी तुकारामनगर भागातील दशरथ भुवन इमारतीत प्रचारा दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार नितीन मट्या पाटील, शिवसेनेचे अपक्ष उमेदवार रवी मट्या पाटील यांनी केला.
















