एकीकडे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध दिवसेंदिवस चांगलेच भडकत आहे. परिणामी या युद्धाचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांवर पडत आहे. भारतात इंधन महाग झाले आहे. गॅस सिलिंडरची किंमतही वाढली आहे. या युद्धामुळे जगाची झोप अगोदरच उडालेली असताना आता उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले आहेत. ‘किम जोंग उन’ने एकापाठोपाठ एक १० बॅलिस्टिक मिसाईल्स डागून सर्वांची झोप उडवली आहे. ही केवळ चाचणी आहे की महायुद्धाची तयारी? पाहूया….