मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जूनमध्ये पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सरकार अशी वेळ आमच्यावर येऊ देणार नाही. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसतं तर फडणवीसांनी जीआर काढला नसता. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, जर सरकारने फसवणूक केली तर जेरीस आणू असा इशाराही त्यांनी दिला.














