संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित विद्यार्थिनी ही संगमनेरमधील एका विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असून, शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ॲसिड फेकले. या प्रकरणी फरार आरोपीचा पोलीस शोध
घेत आहेत. या प्रकरणी लवकर तपास करण्याची सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.















