Sanjay Raut: संगमनेरमधील वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे. या घटनेमुळे संगमनेर हदरलं आहे. अशातच आता या घटनेबाबत प्रश्न विचारताच संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “फडणवीसांनी गृहखात्याचा त्याग केला पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.













