Sangmner Acid Attack: संगमनेरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एक चिमुकली शाळेतून घरी परतत असताना एका तरुणाने तिच्यावर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेरमधील तळेगाव फाटा, वडगाव पान येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोनात अनेक संगमनेरकर सहभागी झाले. घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संगमनेकरांनी केली आहे. तसेच जयश्री थोरात या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या.













