Rupali Thombare Patil: महिलेवर अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात या ज्योतिषाला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खरातच्या मागे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या छत्री घेऊन उभ्या असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन आता रुपाली चाकरणकर यांच्यावर टीका होत आहे. अशातच रुपाली ठोंबरे यांनी देखील आता रुपाली चाकरणकर यांच्यावर टीका केली आहे.










