अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यात एकच खळबळ माजली आहे. खरातने कोट्यवधींची माया जमविण्यासह अनेक अनुचित प्रकार केल्याचं उघड होऊ लागले आहे. खरातच्या कार्यालयातून पोलिसांना सापडलेल्या ५८ व्हिडीओंमध्ये राजकीय मंडळींसह विविध क्षेत्रातील नामांकित महिलांचीही माहिती असल्याने गोपनीयता बाळगली जात आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन आठवड्यापूर्वीच आली होती, अशी माहिती समोर आली आहे. याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेऊ.











