साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गोंधळात त्यांच्या डाव्या हाताला जखम झाली. या घटनेनंतर पालकमंत्री देसाई यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक झाले असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.









