भोंदूगिरी करून महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या स्वयंघोषित बाबाला पोलिसांनी अटक केली असून त्याला २४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आलेल्या असताना दुसरीकडे अजित पवार विमान अपघात प्रकरणीही या भोंदूबाबाचं नाव आता जोडलं जात आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.











