नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.













