सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाली. दरम्यान, यावेळी आमदार जयंत पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर खोचक टोला लगावला होता. या टीकेला आज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.














