रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावर सुषमा अंधारे यांनी आज प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यावर मला हसायला आलं. कारण, माणसं केविलवाणी धडपड करतात. पण त्याने काही फरक पडणार नाही. मला नोटीस वगैरे पाठवण्याचं राहूद्या. तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.”












