सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून भाजप आणि राष्ट्रवादी–शिवसेनेत राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडून भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं.दरम्यान, शंभूराज देसाई यांच्या टीकेला मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.













