अशोक खरात प्रकरणी अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अशा भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे. तसंच मविआ सरकारच्या काळात खरातच्या संस्थानासाठी घेतलेल्या निर्णयावरही उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.











