महिलेवरील अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची धक्कादायक प्रकरणं आता एकापाठोपाठ एक समोर येऊ लागली आहेत. गरोदरपणात करावयाच्या पूजाविधीचं कारण देत खरातने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात एका पीडितेनं हिंमत दाखवल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात खरातकडे गरोदर पत्नीला घेऊन गेलेला पती आता तक्रार देण्यासाठी पुढे आला आहे.














