नाशिकमधली भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat ) बलात्कार प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे. या भोंदूबाबा खरातने अनेक पराक्रम केले असून रोज नवनवीन खुलासे होते. खरातसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर वर्षभरापूर्वी खरातचं प्रकरण उघड करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी आता आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाहीतर रुपाली चाकणकर यांनी वृत्तपत्र बंद करण्यासाठीच पोलिसांना पत्र दिलं होतं, असा गौप्यस्फोटही खेमनर यांनी केला.










