सातारा जिल्हा परिषदेत जो प्रकार घडला त्यावर आज विधानसभेत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. तसंच मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, शिंदे यांनी या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.














