दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देश सोमवारी एका भीषण विमान अपघातानं हादरला आहे. या विमान दुर्घेटनेत जवळपास ६६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. एसोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार मृत आणि जखमींमध्ये जवानांची संख्या अधिक आहे. विमानात १२१ जवान आणि क्रू सदस्य होते, उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात हे विमान कोसळलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.










