नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडवून दिली आहे. अशोक खरातबरोबर अनेक राजकीय नेत्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. दरम्यान, अशोक खरातसह त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडलेलं हे परखड मत.











