“भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो. आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं त्या ठिकाणी ते भोंदू बाबा होते, त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला, ते माझ्यापेक्षा मोठे असल्याने संस्कृतीप्रमाणे मी त्यांच्या पाया पडलो. आम्हाला माहीत असतं की हा महाराज कामाचा नाही, पण समाज मन जपण्यासाठी आम्ही जातो, मात्र आम्ही त्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तर त्या भोंदू महाराजांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा गेले, एकनाथ शिंदे, विखे पाटील ते सुद्धा तिथे गेले पण त्यांना विचारलं का?
असा उलट सवालही त्यांनी केला.










