राज्यात अशोक खरातच प्रकरण गाजत असतानाच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातच घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टीची मागणी केली आहे. यादरम्यान महायुतीतील मंत्र्याचा हा अश्लील व्हिडीओ कुणी आणि कसा रेकॉर्ड केली, याबाबतची खळबळजनक माहिती समोर आली आहे.










