Sanjay Raut: महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ यांची एक अश्लील चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे.












