धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. रामराव पाटील अस मृत व्यक्तीचं नाव आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण करत आहेत. उपोषणादरम्यान आपल्या जावयाची खालावत चाललेली प्रकृती पाहून मानसिक ताण वाढल्याने सासरे रामराव पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. जालना शहरातील छत्रपती कॉलनी येथील राहत्या घरी ही घटना घडली.













