जयपूरच्या 22 गोदाम पुलिया परिसरात किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका तरुणीने स्कूटी थांबवून दगडाने एका तरुणाच्या बुलेट बाईकची तोडफोड केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. किरकोळ वाद इतका टोकाला जाणे, यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून या व्हिडिओवर सोशल मीडियात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.










