Aditya Thackeray: भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणी एखाद्या शुभ कार्याला बोलावलं असेल तर जायाला हरकत नाही, असं मला वाटतं. मंगल कार्यात बोलावलं असेल तर तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून कोणी गेलं असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारणं किंवा बातम्या देणं मला योग्य वाटत नाही. संघर्ष कधी संपत नाही. त्या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्यामध्ये थोड्यावेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते”, असं संजय राऊत म्हणाले.












