Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे रिक्षाचालकांचे हाल होत असून त्यांनी आज पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेत आपल्या अडचणी मांडल्या. देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्याचा मोठा फटका छत्रपती संभाजीनगरमधील ऑटो रिक्षाचालकांना बसत आहे. शहरातील बारा गॅस पंपांपैकी केवळ चार पंप सुरू होते आणि कालपासून तेही बंद झाल्याने रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हातावर पोट असलेल्या या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली असून मानसिक त्रासही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन गॅस टंचाई, वाढते दर आणि पंपांवरील गैरप्रकार याबाबत सविस्तर चर्चा केली.या वेळी पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी अन्नपुरवठा अधिकाऱ्यांना तातडीने संपर्क साधून, गॅस पंपांवर जर कोणी अनधिकृतपणे जास्त पैसे घेत असेल तर अशा पंपांवर परवाना रद्द करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.














