Social Media KYC mandatory with Aadhar Card and PAN card: सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी लवकरच आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र सरकारला द्यावे लागू शकते. सोशल मीडिया अकाउंटचे लॉग इन करताना, त्यावर काही पोस्ट करताना किंवा चालू असलेले अकाउंट सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला KYC व्हेरिफिकेशन करावे लागू शकते. सोशल मीडिया व सायबर क्राइमचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने एक अहवाल केंद्र सरकारकडे नुकताच सोपवला आहे. त्यातील शिफारसी लागू झाल्यास भारतात सोशल मीडियाचा वापर करण्याची पद्धत, तसेच सुरक्षितता वाढू शकते. देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सोशल मीडिया वापरकर्त्यांचे KYC करावे असे संसदीय समितीने सुचवले. याचा काय परिणाम होईल? संसदीय समितीने सोशल मीडिया वापरकर्त्यांची KYC करणे का सुचवले ते सविस्तर जाणून घेऊयात..














