शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठोपाठ आता पक्षाच्या महिला नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचंही नाव भोंदूबाबा अशोक खरातशी नियमित संपर्क ठेवणाऱ्यांमध्ये असल्याचा आरोप होत आहे. आमदारकी आणि मंत्रिपद मिळेल का, असं भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांनी खरातची नाशिकमध्ये तीन वेळा भेट घेतली होती. यातील दोन वेळा त्या भोंदूबाबाच्या कार्यालयात गेल्या, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला. त्यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.















