गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील पापरी गावात फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष, डाळिंब, पेरू यांसह अनेक फळपिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, सोलापूर दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या सगळ्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनीही आपली व्यथा अमित ठाकरेंसमोर मांडली.













