इस्त्रायल विरुद्ध इराण यांच्यातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या ऊर्जासंकटाचा फटका आता सगळ्यांनाच बसताना दिसत आहे. त्यामुळे इंधन टंचाईला पर्याय म्हणून इथेनाॅलच्या वापरावर अधिक भर देण्याची चर्चा सुरू आहे. हा मुद्दा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केल्यानंतर या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर इथेनाॅलच्या संभाव्य प्रभावी वापरासंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले हे विश्लेषण.














