विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेदेखील अशोक खरातच्या संपर्कात होत्या असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हेंवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. कॅप्टनने तुम्हाला चांगलीच कॅप्टन्सी दिली. आता तुझे पुरावे बाहेर येत आहेत, त्याला सामोर जा म्हणत किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंवर टीकास्त्र डागलं.














