Sanjay Raut On Ashok Kharat । भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ‘हमाम में सब नंगे’ असं म्हणत त्यांनी या प्रकरणात मोठ्या लोकांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. खरातने घेतलेली नावे आणि त्याच्याशी संबंधित लोकांची माहिती पोलिसांनी आणि एसआयटीने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.














