Jain Muni On Maharani Tararani News | महाराणी ताराराणी या जैन समूदायच्या होत्या, असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.. औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं. मुंबईतील जैन समूदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत.. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही.. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी असे वक्तव्य करू नयेत… असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत म्हणालेत..









