Eknath Shinde: टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India – 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना सलमान खानचे कौतुक केले.










