दख्खनचा राजा जोतिबा यांच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस असून कोल्हापुरात भक्तांचा महासागर उसळलाय. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविक जोतिबा डोंगर येथे दाखल झाले आहेत.आज दिवसभरात तब्बल दहा लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या १०८ मानाच्या सासनकाठ्या आधीच दाखल झाल्या असून, महाराष्ट्रासह सीमाभागातून शेकडो सासनकाठ्या यात्रेत सहभागी झाल्या आहेत.













