महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या, असे वक्तव्य समोर आल्यानंतर कराड तालुक्यातील तळबीड गावच्या ताराराणींच्या वंशजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नयन पद्मसागर या जैनमुनींनी हे वक्तव्य केलं होतं. ताराराणींच्या वंशजांची जैन मुनिंनी जाहीर माफी मागावी, तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.














