Maharashtra Weather Update: यंदा पुणे शहरात मार्चमध्येच शिवाजीनगर येथे कमाल तापमान चाळिशीच्या जवळपास पोहोचले. पण, तरी महिन्याचे सरासरी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मार्चमधील कमाल तापमानात घट झाली. त्याचबरोबर, मार्चमधील गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊसही नोंदवला गेला. त्यामुळे मार्च महिना हा पुणे शहर आणि परिसरासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. एप्रिल महिन्यातील हवामानाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे. त्याबाबत या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…











