Hasan Mushrif:सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये २८ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यानचा पत्रव्यवहार अधिकृत धरला जाऊ नये, असे म्हटले आहे. या पत्रामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची यादी दिली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची नावे पदाशिवाय नमूद आहेत. या पत्राची चर्चा आता राजकीय वर्तुळा होत आहे. यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.














